मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
योजने विषयी अधिक माहिती
महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील महिलांना आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या माध्यमातून राज्याची महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महिलांना प्रत्येक महिन्यात 1500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.या योजनेच्या अंतर्गत राज्याच्या पात्र महिलांना लाभ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार माझी लाडकी बहिन योजनेसाठी Narishakti Doot App मार्फत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
१. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.
आधार कार्ड
बँक पासबुक
अर्जदाराचे हमीपत्र
अधिवास /जन्म प्रमाणपत्र
उत्पन्न दाखला
आधार कार्ड
महिलेचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे
अधिवास / जन्म प्रमाणपत्र
१५ वर्षापूर्वीचे पुरावे म्हणून या पैकी एक
१. रेशन कार्ड
२. मतदान ओळखपत्र
३. जन्म दाखला
४. शाळा सोडल्याचा दाखला
महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचे कागदपत्रे
१५ वर्षापूर्वीचे पुरावे म्हणून या पैकी एक
१. रेशन कार्ड
२. मतदान ओळखपत्र
३. जन्म दाखला
४. शाळा सोडल्याचा दाखला
उत्पन्न दाखला
उत्पन्न दाखल नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
- महिलेचे संपूर्ण नाव-(आधार कार्ड प्रमाणे )
- पतीचे / वडिलांचे नाव
- जन्म दिनांक: दिनांक/ महिना/वर्ष
- अर्जदाराचा संपूर्ण पत्ता
- जन्माचे ठिकाण
- जिल्हा
- गाव/वाहर
- ग्रामपंचायत/ नगरपंचायत/ नगरपालिका
- पिनकोड
- मोबाईल क्रमांक
- आधार क्रमांक
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात देणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? होय/नाही. असल्यास, दरमहा रु.
- वैवाहिक स्थिती
- महिलेचे लग्नापूर्वीचे नाव
- महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का?
- अर्जदाराचे बैंक खाते असलेल्या
- बँकेचे पूर्ण नाव
- बँक खाते धारकाये नाग
- बँक खाते क्रमाक
- IFSC कोड
- आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? होय किंवा नाही
- सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर/Upload करण्यात यावी
- आधार कार्ड
- अधिवात/जन्म प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- अर्जदाराने हमीपत्र
- बँक पासबुक
- अर्जदाराणा फोटो
ऑनलाईन भरलेला अर्ज यांच्याकडे जमा करावा Narishakti Prakar/नारीशक्ती प्रकार:
१. अंगणवाडी सेविका
२. अंगणवाडी मदतनीस
३. पर्यवेधिका
४. ग्रामसेवक
५. वार्ड अधिकारी
Narishakti Doot Application Form PDF
Download Now
हि सरकारी वेबसाईट नसून केवळ लोकांना सरकारी योजने विषयी अधिक माहिती मिळावी व लोकांना योजना फायदा मिळावा या हेतू हि वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.